नगाव शिवारात अॅल्युमिनिअम चोरी : दोघे आरोपी जाळ्यात
धुळे : धुळे तालुक्यातील नगाव शिवारातील टा्रन्समिशन वर्ल्ड या कंपनीच्या गोडावूनमधून चोरट्यांनी वॉचमन व हॉटेल कामगारांना मारहाण करीत एक लाख 82 हजारांचे अॅल्युमिनिअम तार लांबवले होते. अवघ्या 24 तासात आरोपींना पकडण्यात धुळे स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. बोलेरा वाहनासह रीझवान शेख रहिम (अजमेरा नगर) यास ताब्यात घेतल्यानंतर त्याचे अन्य साथीदारही या गुन्ह्यात सहभागी असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपी इम्रान खान नुरखान पठाण (मोलवीगंज, धुळे) यास यास अटक करण्यात आली. चारचाकी वाहनासह चार लाख 60 हजार 680 रुपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला. दोघा आरोपींना मुद्देमालासह देवपूर पश्चिम ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

