यावल शहरात विविध विकासकामांचे भूमिपूजन
यावल (मंगळवार, 29 सप्टेंबर 2026) : यावल शहरातील विस्तारीत भागात असलेल्या मदिना नगर व कृष्णतारा नगर याभागात मंगळवारी विविध विकासकामांचे भूमिपूजन मंगळवारी नगराध्यक्ष छायाताई पाटील यांच्या उपस्थितीत स्थानिक नागरीकांच्या हस्ते करण्यात आले. सहकारी नगरसेवकांसह नागरीकांची उपस्थिती होती.
या भागात विकासकामे होणार
शहरातील विस्तारीत भागात मदिना नगर व कृष्णतारा नगर आहे. यात मदिना नगरात रस्त्यांचे डांबरीकरण, काही रस्त्यांचे काँक्रिटीकरण व रस्त्याच्या कडेला गटारी बांधण्यात येणार आहे. यासाठी 49.98 लाखांचा निधी मंजूर आहे तर कृष्णतारा नगरात डांबरी रस्त्याच्या कामास मंजुरी देण्यात आली. हे काम हे 35.91 लक्ष रुपयात केले जाणार आहे. याच भागात गटार बांधकामास देखील 13 लाखांचा निधी मंजूर करीत ते कामदेखील केले जाणार आहे. या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष छायाताई पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
नगरसेवक अतुल पाटील, गटनेते सागर चौधरी, नगरसेवक निसार शेख, काँग्रेस शहराध्यक्ष मो.हकीम मो.याकुब, कदीर खान, उमर कच्छी, उबाठाचे तालुका प्रमुख शरद कोळी, निलेश बारी, उबाठा शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, पप्पू जोशी, सारंग बेहेडे, जुगल घारू, भूषण खैरे, गोलु माळी, नरेंद्र शिंदेसह आदींची उपस्थिती होती.
