रावेरात केळी उत्पादक शेतकर्‍यांचे उद्या भजन आंदोलन

केळी पिकविम्याचे महसूल मंडळ व नुकसान भरपाई मिळण्यासाठी गांधी जयंतीनिमित्त आंदोलन


रावेर (गुरुवार, 1 ऑक्टोबर 2026) : पीक विम्याबाबत केळी उत्पादकांना हेक्टरी भरपाई जाहीर करण्यात आली असलीतरी प्रत्यक्षात किती भरपाई मिळणार हे स्पष्ट नसल्याने रावेर तालुक्यातील केळी उत्पादकांतर्फे शुक्रवार, 2 ऑक्टोबर रोजी रावेरात भजन आंदोलन करण्यात येणार आहे.

काय आहेत केळी उत्पादकांच्या मागण्या ?
गेल्या महिन्यात 15 सप्टेंबर रोजी पीकविमा कंपनीच्या अधिकार्‍यांनी पुणे येथील बैठकीचा हवाला देत 30 सप्टेंबरपर्यंत पीक विम्याचे महसूल मंडळ जाहीर करून रक्कम टाकण्यात येईल, असे आश्वासन शेतकर्‍यांना देण्यात आले तसेच वादळामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकर्‍यांना मध्य प्रदेशच्या धर्तीवर नुकसान भरपाई देऊन ती तत्काळ शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम टाकण्याची मागणी होती. त्या अनुषंगाने रक्कम जाहीर करण्यात आली असली तरी केळी उत्पादकांना प्रति हेक्टरी किती रक्कम मिळेल ते अजूनही जाहीर केलेले नाही तसेच 31 जुलै रोजी पीक विम्याची मुदत संपली असताना ही आतापर्यंत महसूल मंडळे घोषित करण्यात आलेली नाही.

याबाबत ही माहिती सार्वजनिक करावी अशी शेतकर्‍यांनी शासनाकडे मागणी होती मात्र 30 सप्टेंबर उलटूनही याबाबत कोणतीही घोषणा आली नसल्याने प्रशासनाच्या लक्षात आणून केळी पिकविम्यातील कमी दाखविलेले 14 हजार शेतकर्‍यांचे क्षेत्र पुन्हा पूर्ववत करून त्या अनुषंगाने विम्याची रक्कम मिळावी तसेच तीन महिने उलटून ही या मागण्यांकडे शासनाने लक्ष दिलेले नाही. यासाठी 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त त्यांच्या गांधीजी भजनासह शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे. केळी उत्पादक शेतकर्‍यांनी उपस्थितीचे आवाहन शेतकरी सुनील कोंडे व अन्य केळी उत्पादक बांधवांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !