भुसावळातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात वैद्यकीय तपासणी शिबिर
भुसावळ (गुरुवार, 1 ऑक्टोबर 2026) : शहरातील कला, विज्ञान व पु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात 29 ते 30 या कालावधीत पदवी प्रथम वर्ष बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी, बीसीए व पदव्युत्तर प्रथम वर्ष एम.ए. एम. कॉम, एम.एसस्सी, एमसीए विभागातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे, उपप्राचार्य डॉ.डी.एन. पाटील, उपप्राचार्य डॉ.जी.आर.वाणी, वैद्यकीय समिती प्रमुख डॉ.स्वाती फालक यांच्या उपस्थितीत शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. डॉ.केतन महाजन व डॉ.विरेंद्र महाजन, नेत्ररोग तज्ञ डॉ.चारुलता पाटील, स्त्री रोग तज्ञ डॉ.अभय जावळे, कान, नाक, घसा तज्ञ डॉ.चैताली झांबरे, दंतरोग तज्ञ डॉ.विद्याधर भोळे यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होऊन निरोगी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित झाले.
यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
या शिबिरासाठी समिती सदस्य म्हणून प्रा.डॉ.एस.टी धूम, प्रा.डॉ.प्रफुल्ल इंगोले, प्रा.डॉ.विलास महिरे, प्रा.डॉ सचिन कोलते, प्रा.अजय क्षीरसागर, प्रा.गौतम भालेराव, प्रा.डॉ.दीनानाथ पाठक, प्रा.मनोज पाटील आदींनी परिश्रम घेतले. कार्यालयीन प्रबंधक भगवान तायडे, कार्यालय अधीक्षक सचिन पाटील, वरिष्ठ लिपिक गिरीश आव्हाड, गणेश ठाकूर यांनी परिश्रम घेतले.
