भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती उत्साहात


भुसावळ (शनिवार, 3 ऑक्टोबर 2026) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 157 वी आणि लालबहादूर शास्त्री यांची 122 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता अडकमोल, उपमुख्याध्यापक एस पी.पाठक, पर्यवेक्षक एस.एल राणे, बी.बी.जोगी, संगणक विभागप्रमुख बी.ए पाटील, संगणक विभागासह विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पूर्वी न्हावकर, अनन्या राठी व मनवा वाघ या विद्यार्थिनींनी महात्मा गांधीजींच्या जीवनावर प्रकाश टाकला. भाविका वाणी व भाग्यश्री हिवाळे या विद्यार्थिनींनी लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यावर वक्तृत्व सादर केली. सूत्रसंचालन एन.जे.खाचणे यांनी केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !