मंत्री संजय सावकारे यांच्या नेतृत्वावर विश्वास : राष्ट्रवादी पदाधिकार्‍याचा भाजपात प्रवेश


भुसावळ (रविवार, 4 ऑक्टोबर 2026) : महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाच्या सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष निखील आनंद सपकाळे यांनी आपल्या सहकार्‍यांसह रविवारी भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, जळगाव पूर्व जिल्हा उपाध्यक्ष राहुल वसंतदादा तायडे यांच्या माध्यमातून करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्‍हाटे, जिल्हा चिटणीस गिरीश महाजन, गटनेते युवराज लोणारी, शहराध्यक्ष किरण कोलते, तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, नगरसेवक राजेंद्र आवटे, नितीन धांडे, सीमा नरवाडे, प्रशांत नरवाडे, प्रेमचंद तायडे यांच्यासह भाजपा नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !