धुळे शहरच्या निरीक्षकपदी अर्चना पाटील तर तालुक्याचे हेमंतकुमार भामरे प्रभारी निरीक्षक
धुळे जिल्हा पोलीस दलातील पाच अधिकार्यांच्या बदल्या : नरडाण्याचेही बदलले अधिकारी
गणेश वाघ
धुळे (मंगळवार, 13 ऑक्टोबर 2026) : धुळे जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने पाच पोलीस अधिकार्यांच्या पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी यांनी बदल्या केल्या आहेत. संबंधित अधिकार्यांनी नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तत्काळ हजर होऊन कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश मंगळवारी काढण्यात आलेल्या आदेशात देण्यात आले आहेत.
अशा झाल्या बदल्या
धुळे तालुक्याचे निरीक्षक धनंजय पाटील यांची नंदुरबार जिल्ह्यात बदली झाल्यानंतर रिक्त पदावर धुळे शहरचे निरीक्षक हेमंतकुमार साहेबराव भामरे यांच्याकडे आता धुळे तालुक्याची धुरा सोपवण्यात आली तर धुळे शहरला नियंत्रण कक्षातील अर्चना सुपडू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा विशेष शाखेचे राजू संपत सुर्वे यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेचा अतिरीक्त कारभार सोपवण्यात आला. धुळे नियंत्रण कक्षातील सहा.निरीक्षक निलेश रमेशसिंग मोरे यांच्याकडे नरडाणा पोलीस ठाण्याची धूरा सोपवण्यात आली तर नरडाण्याचे सहा.निरीक्षक सचिन कापडणीस यांची धुळे आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली.





तत्काळ हजर होण्याचे आदेश
संबंधित अधिकार्यांनी नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तत्काळ रुजू होऊन अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश अधीक्षकांनी दिले आहेत. या प्रशासकीय फेरबदलामुळे जिल्हा पोलीस दलातील कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे.
