एमपीएससीमध्ये मोठे प्रशासकीय बदल : सचिवपदी सौरभ कटियार यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार


मुंबई (बुधवार, 14 ऑक्टोबर 2026) : एमपीएससीमध्ये पेपरफुटी प्रकरणामुळे आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना राज्य सरकारने प्रशासकीय पातळीवर महत्त्वाची पावले उचलली आहेत. महेंद्र हरपाळकर यांची सचिवपदावरून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी सौरभ कटियार यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. दरम्यान, आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तात्पुरती अन्य सदस्याकडे सोपविण्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे.

रोहित पवारांची प्रतिक्रिया ; नव्या अध्यक्षांची प्रतीक्षा
सचिवपदावरील बदलानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली. चझडउ आयोगाला नवीन प्रभारी सचिव मिळाले असून, आता नव्या अध्यक्षांची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी म्हटले. दोन महिन्यांनंतर विद्यार्थ्यांच्या अपेक्षांना न्याय देणारे नवे अध्यक्ष मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.






अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर
पेपरफुटी प्रकरणावरून पुण्यात विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांच्या सूचनेनंतर आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला प्राधान्य दिले असून, चौकशीच्या काळात पदावर कार्यरत न राहण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती
पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीला अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. राज्यपालांची मान्यता आणि अधिकृत अधिसूचनेनंतर समितीचे कामकाज सुरू होणार आहे.

नव्या अध्यक्षपदाची जबाबदारी कोणाकडे ?
चौकशीचा अहवाल आणि त्यानंतर सरकारकडून घेतला जाणारा निर्णय लक्षात घेता, तोपर्यंत आयोगाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार अन्य सदस्याकडे देण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे चझडउ मधील या बदलांनंतर आयोगाच्या कामकाजात कोणते निर्णय घेतले जातात आणि नव्या अध्यक्षपदाची जबाबदारी कोणाकडे जाते, याकडे राज्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !