जैन इरिगेशन 19 हजार टन बायोचार कार्बन क्रेडिट्सचा पुरवठा करणार ‘सुपरक्रिटिकल’ कंपनीसोबत महत्त्वपूर्ण करार


जळगाव (शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026) : कृषी आणि सिंचन क्षेत्रातील आघाडीची कंपनी ’जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड’ने पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे. कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कार्बन रिमूव्हल मार्केटप्लेस ’सुपरक्रिटिकल’ सोबत एक धोरणात्मक करार केला आहे. या करारांतर्गत जैन इरिगेशन 2026-27 या कालावधीत तब्बल 19,000 टनांपर्यंतच्या ’बायोचार कार्बन रिमूव्हल क्रेडिट्स’चा पुरवठा करणार आहे.

औद्योगिक कचर्‍यातून महसूल निर्मिती
जैन इरिगेशनच्या जळगाव (महाराष्ट्र) येथील अत्याधुनिक औद्योगिक बायोचार प्रकल्पातून हे कार्बन क्रेडिट्स तयार केले जातील. या प्रकल्पात शेतीचा कचरा आणि अन्न प्रक्रिया उद्योगातून निघणार्‍या अवशेषांवर ’गॅसिफिकेशन’ (ॠरीळषळलरींळेप) प्रक्रियेद्वारे प्रक्रिया केली जाते. यातून ’बायोचार’ तयार होतो. बायोचार जमिनीत मिसळल्यास, तो हवेतील घातक कार्बन शोषून अनेक शतकांपर्यंत जमिनीत सुरक्षितपणे साठवून ठेवतो. यामुळे पर्यावरणातील कार्बनचे प्रमाण कमी करण्यास मोठी मदत होते.

शाश्वत आणि पर्यावरणपूरक मॉडेल
बायोचार प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रक्रियेतून निर्माण होणार्‍या सर्व घटकांचा पुनर्वापर केला जातो. प्रक्रियेदरम्यान तयार होणारा ’सिनगॅस’ जैन इरिगेशनच्या कारखान्यांमध्ये जीवाश्म इंधनाचा (ऋेीीळश्र र्ऋीशश्र) पर्याय म्हणून वापरला जातो. तर तयार झालेला बायोचार कंपनीच्या कृषी व्यवसायांमध्ये आणि स्थानिक शेतकर्‍यांना जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी दिला जातो. यामुळे कंपनीचा नवीन प्रकल्पांसाठी लागणारा भांडवली खर्च तर वाचलाच आहे, शिवाय कचर्‍यातून संपत्ती निर्मितीचे एक आदर्श मॉडेल उभे राहिले आहे.

जैन इरिगेशनकडे 60 वर्षांच्या विश्वासाची भक्कम साखळी
सुपरक्रिटिकल कंपनीचे पुरवठा व्यवस्थापक स्टीव्ह मॉरिन यांनी सांगितले की, इतर कंपन्यांना बायोचार प्रकल्पांसाठी पुरवठा साखळी शून्यातून उभी करावी लागते. मात्र, जैन इरिगेशनकडे 60 वर्षांहून अधिक काळचे मजबूत नेटवर्क आणि 1 कोटींहून अधिक शेतकर्‍यांचा आधार आहे. जैन इरिगेशन ही जगातील सर्वात मोठी मँगो प्रोसेसिंग (आंबा प्रक्रिया) कंपनी आणि दरवर्षी 15 कोटी रोपांची निर्मिती करणारी टिश्युकल्चर नर्सरी चालवते. त्यामुळे त्यांना कच्चा माल आणि वितरणासाठी कोणतीही अडचण नाही.

बाजारात वाढती मागणी
सुपरक्रिटिकलच्या ताज्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर उच्च दर्जाच्या बायोचार क्रेडिट्सची मागणी प्रचंड वाढली आहे. 2026 च्या एकूण उपलब्ध कोट्यापैकी 81% कोटा जुलै महिन्यातच बूक झाला होता, जो गेल्या वर्षाच्या तुलनेत 3 महिने आधीच संपला आहे. कॉर्पोरेट कंपन्या आता एका वेळच्या खरेदीऐवजी जैन इरिगेशनसारख्या विश्वासू कंपन्यांसोबत बहु-वार्षिक करार करत आहेत. या प्रकल्पाची विश्वासार्हता वाढवण्यासाठी सध्या जागतिक पातळीवरील ’र्झीीे.शरीींह’ द्वारे पडताळणी सुरू आहे, ’इशनशीे उरीलेप’ कडून स्वतंत्र मानांकन (ठरींळपस) देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !