डीबीटी योजना पुन्हा सुरू करा : यावल प्रकल्प अधिकार्यांना अभाविप यावल शाखेचे निवेदन
यावल (शनिवार, 31 ऑक्टोबर 2024) : यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात अभाविप यावल शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आले. विद्यार्थ्यांना विविध योजनांचे ज्याप्रमाणे थेट बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून लाभ दिला जात होता त्यानुसारच लाभ दिला जावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण ?
आदिवासी विकास विभागांतर्गत वसतिगृहांमध्ये वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी भोजनाकरिता थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) योजना पुन्हा सुरू करण्यासंदर्भात आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांना निवेदन देण्यात आले.

अभाविप यावल शाखेच्या वतीने सदर निवेदन देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आर्थिक व वैयक्तिक गरजांचा विचार करून भोजनासाठी डीबीटी योजना पुन्हा सुरू केल्यास विद्यार्थ्यांना अधिक स्वायत्तता आणि सोय मिळू शकते असे त्यांचे म्हणणे आहे. निवेदन देतेवेळी भुसावळ जिल्हा सहसंयोजक अथर्व जंगले, संघर्ष नाईक, ओम जाधव, विनोद पावरा सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


