कोळन्हावी गावात धाडसी घरफोडी : सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखाचा मुद्देमाल लंपास


यावल (शनिवार, 31 ऑक्टोबर 2024) : यावल तालुक्यातील कोळन्हावी गावात अज्ञात चोरट्यांनी घरातील मागच्या दरवाज्याचे कडी कोंड्याला तोडून घरात प्रवेश करीत घरातील दुसर्‍या खोलीचे दार तोडून कपाटात असलेले सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम असा एक लाखाचा मुद्देमाल लांबवला. हा प्रकार बुधवारी सकाळी निदर्शनास आला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांची धाव
घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला तसेच फॉरेन्सिकच्या पथकाला बोलवण्यात आले. कोळन्हावी गावातील रहिवासी भूषण वासुदेव सोळंके यांच्या घरात धाडसी घरफोडी झाली. सोळंके हे कुटुंबासह पुढील खोली झोपलेले असतांना मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागील दरवाज्याचे कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील दुसर्‍या खोलीतील दरवाजा तोडून कपाटातून सोन्या चांदीचे 94 हजार रुपये किंमतीचे दागिने तसेच सहा हजारांची रोकड असा एक लाखांचा मुद्देमाल लांबवण्यात आला.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तातडीने यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी पथकासह दाखल झाले. त्या ठिकाणी पंचनामा करण्यात आला व फॉरेन्सिकच्या पथकाला बोलवण्यात आले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !