जळगाव जिल्हा परिषदेत लाचखोर हादरले : बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांसह दोघे जाळ्यात
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने खळबळ : दहा हजारांची लाच घेताच आवळल्या मुसक्या
गणेश वाघ
भुसावळ (सोमवार, 2 नोव्हेंबर 2026) : जळगाव जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यासह लिपिकाला दहा हजारांची लाच घेताना सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. उपकार्यकारी अभियंता सतीश शिसोदे व लिपिक भागवत चौरे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
जनजागृती सुरू असतानाच एसीबीची कारवाई
सरकारी कार्यालयांमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी एसीबीकडून अलीकडेच मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे व लाचखोरांविरोधात तक्रारी देण्याचे आवाहन केले जात असतानाच एसीबीच्या गळाला बडा मासा लागला आहे.






जळगाव जिल्हा परिषदेसारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय संस्थेत वरिष्ठ अधिकार्याशी संबंधित कारवाईची माहिती समोर आल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, जळगाव जिल्हा परिषदेत झालेल्या या कथित कारवाईमुळे बांधकाम विभागातील व्यवहार आणि प्रशासकीय कामकाजाबाबत चर्चेला उधाण आले आहे. जळगाव एसीबीचे डॅशिंग पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रेशमा अवतारे व सहकार्यांनी हा सापळा यशस्वी केला.
(कारवाईचा सविस्तर तपशील मिळताच आम्ही बातमी अपडेट करू)