भुसावळातील प्रतिष्ठा मंडळातर्फे उद्योजक मेळाव्याचा उपक्रम स्तुत्य : मंत्री रक्षा खडसे

तीन दिवसीय मेळाव्यात लाखो रुपयांची उलाढाल : रोजगार मिळाल्याने महिलांचे ‘चेहरे उजळले’


भुसावळ (सोमवार, नोव्हेंबर 2026) : भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे दरवर्षी राबवण्यात येणारा महिला उद्योजक मेळाव्याचा उपक्रम अत्यंत स्तुत्य संकल्पना आहे. या मेळाव्यामुळे शेकडो महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध होत असल्याने त्यांची दिवाळी गोड होत असल्याची भावना केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी येथे भेटीप्रसंगी व्यक्त केल्या. 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरदरम्यान आयोजित या मेळाव्याला भुसावळकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर तीन दिवसीय मेळाव्यात लाखो रुपयांची उलाढाल झाली. दरम्यान, मंत्री संजय सावकारे यांच्या आर्थिक सहकार्यातून हा मेळावा पार पडला.

स्थानिक वस्तूंना मिळाली बाजारपेठ
महिला उद्योजक मेळाव्यात दिवाळी सणाला लागणार्‍या विविध वस्तू एकाच दालनाखाली उपलब्ध झाल्याने ग्राहकांना दिवाळी पदार्थ असो वा सजावटीचे साहित्य हे एकाच छताखाली अर्थात ब्राह्मण संघात उपलब्ध झाले. सणा-सुदीच्या काळात महिलांच्या हाताला रोजगार मिळाल्याने त्या माध्यमातून त्या स्वावंलबीदेखील झाल्याचे यावेळी विविध मान्यवरांनी मनोगतातून सांगितले. यंदाच्या मेळाव्यात 200 हून अधिक स्टॉल लावण्यात आले होते.







प्रतिष्ठा मंडळाचा उपक्रम स्तुत्य
भुसावळचे पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांनी भेटीनंतर उपक्रमाचे कौतुक केले. सेवाभावी वृत्तीने शहरातील प्रतिष्ठा मंडळातर्फे 14 वर्षांपासून राबवण्यात येणारा उद्योजक मेळाव्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगत या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध झाला असून महिलांच्या चेहर्यावर स्मित हास्य फुलल्याची भावना व्यक्त केली.

स्थानिक स्तरावर मिळाला रोजगार
महिला समुपदेशक आरती चौधरी, पतंजली योग समितीच्या महानंदा पाटील व बियाणी एज्युकेशन संस्थेच्या संचालिका डॉ.संगीता बियाणी यांनी भेट दिल्यानंतर उपक्रमाचे कौतुक केले. रजनीताई सावकारे यांनी प्रतिष्ठा मंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांची दिवाळी गोड व्हावी या उदात्त भावनेने 14 वर्षांपासून सुरू केलेला उपक्रम निश्चितपच पथदर्शी असल्याचे या मान्यवरांनी सांगितले. यशस्वीतेसाठी प्रतिष्ठा मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केली खरेदी
उद्योजक मेळाव्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, डॉकटर तसेच भुसावळ शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींनी भेट दिली व खरेदी करून खान्देशी पदार्थाची तसेच इतर खाद्य पदार्थांचा मनसोक्त आनंद घेतला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !