राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य रवी कालोसे 5 व 6 नोव्हेंबर रोजी जिल्हा दौर्‍यावर

सफाई कर्मचार्‍यांच्या प्रलंबित प्रश्नांवर होणार चर्चा


जळगाव (सोमवार, 2 नोव्हेंबर 2026) : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य रवी रामू कालोसे हे 5 व 6 नोव्हेंबर 2026 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर येणार आहेत. या दौर्‍यात ते सफाई कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेऊन संबंधित अधिकारी आणि सफाई कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत.

दौर्‍याच्या पहिल्या दिवशी 5 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती कक्षात सफाई कर्मचार्‍यांच्या विविध समस्या व प्रलंबित विषयांबाबत आढावा बैठक घेणार आहे. या बैठकीत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी आदिंसह जिल्ह्यातील सफाई कर्मचार्‍यांच्या प्रतिनिधींशी ते चर्चा करणार आहेत. बैठकीनंतर सायंकाळी 5 वाजता ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.







दौर्‍याच्या दुसर्‍या दिवशी 6 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता ते जामनेर येथील वाल्मीकी नगर वस्तीला भेट देणार असून, तेथील सफाई कर्मचार्‍यांच्या संघटनेसोबत सफाई कर्मचार्‍यांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. सफाई कर्मचार्‍यांच्या प्रलंबीत समस्यांचा आढावा घेण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !