एस.टी.प्रवासात सवलतीचे कार्ड नसलेतरी 31 डिसेंबरपर्यंत महिलांना अर्ध्या तिकीटात करता येईल प्रवास
एनसीएमसी कार्डची अट शिथिल ; यावल एसटी आगार व्यवस्थापक इम्रान पठाण यांची माहिती
यावल (शनिवार, 7 नोव्हेंबर 2026) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस.टी. बसमधून प्रवास करणार्या महिला प्रवाशांना एनसीएमसी कार्डबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. 7 नोव्हेंबर 2026 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत एनसीएमसी कार्डच्या अटीत शिथिलता देण्यात आल्याने सण-उत्सवांच्या काळात महिला प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
महिलांना मोठा दिलासा
यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक इम्रान पठाण यांनी माहिती दिली की, महिला प्रवाशांना प्रवासादरम्यान एनसीएमसी कार्डसंदर्भात येणार्या अडचणी लक्षात घेऊन ही शिथिलता देण्यात आली आहे. यासंदर्भात आगारातील सर्व चालक व वाहकांना लेखी सूचना देण्यात आल्या आहेत त्यामुळे निर्धारित कालावधीत महिला प्रवाशांना एनसीएमसी कार्डच्या अटीमुळे प्रवासात अडचणींचा सामना करावा लागणार नाही.








सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.