अमळनेर शहरातील साठे बिल्डिंगला आग
दुसर्या दिवशी आर.के.फॅक्टरी आवारातही आग
अमळनेर (सोमवार, 9 नोव्हेंबर 2026) : शहरातील राणी लक्ष्मीबाई चौकातील जुन्या साठे बिल्डिंगला अचानक आग लागली. आगीची घटना 8 रोजी सायंकाळी 7. 37 वाजेच्या सुमारास घडली. आगीबाबत माहिती नगरसेवक पंकज चौधरी यांनी अग्निशमन दलास कळवल्याने अग्निशमन दलाने धाव घेत आग विझवली. कर्मचारी दिनेश बिर्हाडे, फारुक शेख ,जफर पठाण, सत्यने संदानशीव, विजय भोई यांचे सहकार्य लाभले.
फटाक्यांमुळे आगीचा संशय ?
दिवाळीच्या फटाक्यांमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. इमारत जुनी झाल्याने छतावर गवत वाढून कोरडे झाल्याने आग वेगात पसरत होती.








9 रोजी मोकळ्या मैदानालाही आग
सोमवार, 9 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आर.के.पटेल कारखान्याच्या मोकळ्या मैदानालाही अचानक आग लागली. फॅक्टरी मालक विनोद पाटील व बिपीन पाटील यांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. दिनेश बिर्हाडे, फारुख शेख, रफीक पठाण, मच्छींद्र चौधरी, भिका संदानशीव व आकाश बाविस्कर यांनी आग विझवली. फटाक्यांमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. दिवसा आग लागल्यामुळे तत्काळ निदर्शनास आले अन्यथा रात्री घडले असते तर शेजारील पेट्रोलपंपाला देखील धोका निर्माण झाला असता.