20 वर्षीय तरुणीने उचलले टोकाचे पाऊल : अमळनेर तालुक्यातील सारबेटेतील घटना


अमळनेर (सोमवार, 9 नोव्हेंबर 2026) : अमळनेर तालुक्यातील सारबेटे गावातील 20 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार, 8 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. शबानाबी अरबाज खान मेवाती (20) असे मृताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

अमळनेर पोलिसात नोंद
रविवार, 8 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास राहत्या घरी छताच्या पंख्याला दोरी बांधून शबानाबी अरबाज खान मेवाती (20) या तरुणाने आत्महत्या केली व याबाबतची माहिती वसीम याने मुलीच्या काकांना कळवली. कुटूंबीय अजिंठा गावी गेल्यानंतर ते तातडीने माघारी फिरले. गावकर्‍यांनी तरुणीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मुलीच्या काकांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !