ठिबक नळ्यांमध्ये अडकून काळविटाचा मृत्यू
अमळनेर (मंगळवार, 10 नोव्हेंबर 2026) : अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री शिवारात ठिबक नळ्यांमध्ये अडकून एका काळविटाचा मृत्यू झाला. दुसर्या काळविटला मुक्त करण्यात शेतकर्यांना यश आले.
ठिबळ नळ्यांमध्ये अडकला काळविट
कावपिंप्री येथील ज्ञानेश्वर माधवराव पाटील यांच्या शेतातील ठिबक नळ्यांच्या गुंडाळीत दोन काळवीट अडकल्याचे ज्ञानेश्वर पाटील आणि दिनेश पाटील यांना आढळून आले. दिनेश पाटील यांनी तातडीने वनपाल गुलाब पिंजारी याना फोन करून कळवले. तत्काळ धनंजय पाटील, विनोद पाटील, भैय्यासाहेब पाटील, भूषण पाटील, योगेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांनी ठिबक नळ्यांचा गुंता काढून एका काळवीटला मुक्त करून जंगलात सोडले तर दुसर्या काळविटाचा मात्र मृत्यू झाला.







