यावल ग्रामीण रुग्णालयात सिव्हिल सर्जन व अधिकार्यांकडून तपासणी
यावल (मंगळवार, 10 नोव्हेंबर 2026) : यावल ग्रामीण रुग्णालयात सिव्हिल सर्जन व अधिकार्यांकडून तपासणी करण्यात आली. कामकाजाचा आढावा घेत त्यांनी समाधान व्यक्त केले तर येथील अडी, अडचणी समजून घेत त्या सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
सुविधांची पाहणी
महाराष्ट्र राज्याचे मा.मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग यांच्या आगामी जळगाव जिल्हा दौर्याच्या पूर्वतयारी आणि अनुषंगाने, जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमधील स्वच्छता, आरोग्यविषयक कामकाज आणि भौतीक सुविधांची पाहणी करण्यासाठी उच्चस्तरीय अधिकारी पथकाने यावल ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या आदेशानुसार, अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.शिवदास सुर्यजी चव्हाण आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपक विष्णुराव जाधव यांनी यावल ग्रामीण रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील वैद्यकीय सेवेचा सविस्तर आढावा घेतला.








स्वच्छतेची केली पाहणी
बाह्यरुग्ण व आंतररुग्ण) विभाग, तसेच रुग्णालयाचा संपूर्ण परिसर व स्वच्छतेची पाहणी करण्यात आली व पाहणी अंती त्यांनी येथील कामकाजाबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. वैद्यकिय अधिकारी डॉ.विजय कुरकूरे यांनी येथील विविध अडी-अडचणी सोडवण्याबाबत वरिष्ठांंना अवगत केले. समस्या सोडवण्याचे वरिष्ठांनी आश्वासन दिले आहे.