एम.ए. मराठी विषयाच्या संदर्भ ग्रंथांमध्ये ‘उजेड पेरणारी माणसं’
वैचारिक साहित्याच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना होणार मदत
जळगाव (सोमवार, 16 नोव्हेंबर 2026) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्र एम.ए. मराठी विषयाचा अभ्यासक्रम निश्चित झाला आहे. त्यातील द्वितीय सत्रात ‘वैचारिक साहित्य’ या अभ्यास घटकासाठी जळगावचे लेखक आनंदा लोटन पाटील यांच्या ‘उजेड पेरणारी माणसं’ या वैचारिक साहित्यकृतीची संदर्भ ग्रंथ म्हणून निवड करण्यात आली आहे.
संदर्भ ग्रंथांची निवड
विभागप्रमुख आणि अभ्यासक्रम समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ.म.सु. पगारे, सदस्य डॉ. दीपक खरात, डॉ. भारती सोनवणे, प्रा. डॉ. युवराज मानकर, डॉ. सुनील अवचार, प्रा. डॉ. आशुतोष पाटील यांनी ‘वैचारिक साहित्य’ या अभ्यास घटकासाठी लागणार्या संदर्भ ग्रंथांची निवड केली आहे.
दोन महिन्यांपूर्वी पुण्याच्या पेन पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या आनंदा लोटन पाटील लिखित ‘उजेड पेरणारी माणसं’ या पुस्तकाची संदर्भ ग्रंथ म्हणून समाविष्ट केला आहे. एम.ए.च्या (भाग 1) द्वितीय सत्रात विद्यार्थ्यांना निवडक वैचारिक लेखनाचा अभ्यास करण्यासाठी या साहित्यकृतीची मदत होईल. दरम्यान, या पुस्तकात खान्देशातील निवडक अशा 84 अवलियांचा संक्षिप्त जीवनप्रवास मांडला आहे. कला, साहित्य, संस्कृती, शिक्षण, ग्रामसंस्कृती अशा विविध क्षेत्रात काम करणारी ही माणसं आहेत.
