माजी विद्यार्थी महाविद्यालयाचे वैभव व भूषण ! : आमदार अमोल जावळे

भालोद महाविद्यालयात 119 माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात


भालोद, ता.यावल (बुधवार, 18 नोव्हेंबर 2026) : सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथे संस्थेच्या शताब्दी पर्वानिमित्त आयोजित माजी विद्यार्थी स्नेह-संवाद मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यास विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या 119 माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली.

आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन
प्रमुख अतिथी रावेरचे आमदार अमोल जावळे यांनी माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना, माजी विद्यार्थी हे महाविद्यालयाचे वैभव व भूषण आहेत, असे गौरवोद्गार काढले. महाविद्यालयातून घडलेल्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत मिळविलेले यश अभिमानास्पद असल्याचे सांगत त्यांनी संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त महाविद्यालयाच्या विकासासाठी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले.

शिक्षक व मित्रांशी संवाद
मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत शिक्षक व मित्रांशी संवाद साधला. ‘एक पत्र महाविद्यालयाच्या नावे’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संगीत खुर्ची, म्युझिकल बॉल, लकी कूपन यांसारख्या मनोरंजनात्मक उपक्रमांनी कार्यक्रमात रंगत आणली.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गणेश नेहेते होते. संस्थेच्या चेअरमन हेमलता इंगळे, प्राचार्य डॉ.किशोर कोल्हे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी आयोजन केले. सूत्रसंचालन उपप्राचार्य प्रा.मुकेश चौधरी यांनी तर आभार प्रा.डॉ.राकेश चौधरी यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !