कोरपावलीत शिविगाळ केल्याच्या संशयावरून एकाला जबर मारहाण
यावल (शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2026) : यावल तालुक्यातील कोरपावली येथे शिविगाळ करीत असल्याच्या संशयावरून झालेल्या वादानंतर एका 35 वर्षीय तरुणाला पाच जणांनी जबर मारहाण केली. यात त्याच्या पायाला जबर दुखापत झाली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पाच जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे नेमके प्रकरण ?
कोरपावली गावातील रहिवासी असलम सत्तार तडवी (35) याने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, शिविगाळ करत असल्याच्या संशयावरून वाद होत त्याला सलीम सायबु तडवी, जुम्मा नबाब तडवी, तय्यब कलंदर तडवी, आलिशान जुम्मा तडवी व सफेना सलीम तडवी या पाच जणांनी शिविगाळ करून मारहाण केली तसेच त्यांच्या डाव्या पायाला जबर दुखापत करण्यात आली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलीस हवालदार सुनील पाटील करीत आहे.
