यावल नगराध्यक्षांसह उबाठा गटाने मुंबई घेतली पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेंची भेट : विविध विषयांवर चर्चा
यावल (शनिवार, 21 नोव्हेंबर 2026) : यावल शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा छायाताई पाटीलसह नगर पालिकेच्या उबाठा गटाने गुरूवारी मुंबई येथे जावून मातोश्रीवर पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. प्रसंगी शहराच्या विविध विकास कामांसह पक्ष संघटन बांधणीवर चर्चा करण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ठाकरे यांनी तालक्यातील पक्ष संघटनासह आगामी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला.
विकासकामांबाबत केली चर्चा
मुंबईत मातोश्रीवर जात यावल नगरपालिकेच्या शिवसेना उबाठाच्या नगराध्यक्ष नगराध्यक्षा छायाताई पाटील यांच्यासह नगरसेवक अतुल पाटील यांनी सत्ताधारी गटातील नगरसेवक व पदाधिकार्यांसह पक्ष प्रमुख्य उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. गुरूवारी दुपारी घेण्यात आलेल्या या भेटीत यावल शहरात कशा प्रकारे विकासकामे सुरू आहेत, आगामी काळात कुठली कामे केली जाणार आहे ? याची माहिती प्रसंगी पक्ष प्रमुख ठाकरे यांनी घेतली. आगामी काळात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाकडून किती उमेदवार दिले जातील? पक्ष संघटन तालुक्यात कसे आहे याचा आढावा प्रसंगी घेण्यात आला.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी तालुकाप्रमुख शरद कोळी, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, शहर उपप्रमुख संतोष धोबी, शिवसेना नगरसेवक सागर चौधरी, नगरसेवक पराग सराफ, निलेश बारी, नगरसेविका वैशाली बारी, उपजिल्हा प्रमुख गोपाल चौधरी, कडू पाटील, नरेंद्र शिंदे, सारंग बेहेडे, मयूर खर्चे, स्वामी पाटील, तेजस यावलकर यांच्यासह अनेक शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
