प्रवाशांसाठी दिलासा ! अमरावती-सुरत एक्सप्रेसला कायमस्वरूपी अतिरिक्त शयनयान कोच
मध्य रेल्वेचा निर्णय ; 22 नोव्हेंबरपासून अंमलबजावणी, उधना-अमरावती विशेषलाही सुविधा
भुसावळ (शनिवार, 21 नोव्हेंबर 2026) : रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने सुरत-अमरावती-सुरत एक्सप्रेससह उधना-अमरावती विशेष रेल्वेच्या डब्यांच्या संरचनेत कायमस्वरूपी बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही गाड्यांना अतिरिक्त शयनयान श्रेणीचा (स्लीपर) कोच जोडण्यात येणार आहे त्यामुळे प्रवाशांना अधिक जागा उपलब्ध होऊन लांब पल्ल्याचा प्रवास अधिक सोयीस्कर होण्यास मदत होणार आहे.
उद्यापासून मिळणार सुविधा
गाडी क्रमांक 20925/20926 सुरत-अमरावती-सुरत एक्सप्रेसला सोमवार, 22 नोव्हेंबर 2026 पासून व 23 नोव्हेंबर 2026 पासून तर गाडी क्रमांक 09013/09014 उधना-अमरावती-उधना विशेष एक्स्प्रेसला उधना येथून 23 पासून तर अमरावती येथून 23 नोव्हेंबर 2026 पासून कोच जोडण्यात येणार आहे. या अतिरिक्त सुविधेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
