15 हजारांची लाच भोवली : तळोदा आदिवासी प्रकल्प विभागातील वरिष्ठ लिपिकासह दोघे एसीबीच्या जाळ्यात

नंदुरबार एसीबीच्या कारवाईने लाचखोर हादरले : आपल्याच विभागातील कर्मचार्‍याकडून मागितली लाच


नंदुरबार (मंगळवार, 24 नोव्हेंबर 2026) : शासकीय कर्मचार्‍यचीा सुधारित वेतन निश्चितीची प्रक्रिया करून वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर करण्याच्या मोबदल्यात 15 हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागातील वरिष्ठ लिपिक सतपालसिंग केशरसिंग वळवी (47, प्लॉट नंबर 50, तळोदा रोड, नंदुरबार) व रोजंदारी कामाठी दुपेंद्रसिंग महेंद्रसिंग पाडवी (45, नाला, ता.अक्कलकुवा) यांना सोमवारी रात्री उशिरा अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.

आपल्याच विभागाच्या कर्मचार्‍याकडे मागितली लाच
39 वर्षीय तक्रारदार हे एकात्मिक आदिवासी विभागात सेवारत असून त्यांचे सुधारित वेतन निश्चिती करून त्यासंबंधीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करण्यासाठी संबंधित कार्यालयातील वळवी यांनी 15 हजारांची लाच मागितली होती. या संदर्भात लाचेची मागणी केल्याची तक्रार नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आी.

कार्यालयात स्वीकारली लाच
या तक्रारीच्या अनुषंगाने 23 नोव्हेंबर 2026 रोजी पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये आरोपी लोकसेवक वळवी यांनी तक्रारदाराकडे 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. तळोदा आदिवासी प्रकल्प कार्यालयाबाहेर सापळा रचण्यात आल्यानंतर आरोपी वळवी याने तक्रारदाराकडून 15 हजारांची लाच स्वीकारून ती कामाठी पाडवी यांच्याकडे दिल्यानंतर दबा धरून असलेल्या पथकाने दोघांना अटक केली.

यांनी केला सापळा  यशस्वी
हा सापळा नंदुरबार एसीबीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार एसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात सहा.उपनिरीक्षक विलास पाटील, हवालदार विजय ठाकरे, हवालदार जितेंद्र महाले, हवालदार नरेंद्र पाटील, हवालदार संदीप खंडारे, नाईक हेमंतकुमार महाले, नाईक सुभाष पावरा आदींच्या पथकाने यशस्वी केला.

लाचखोरांविरोधात तक्रार करण्याचे आवाहन
शासकीय काम करून देण्या-घेण्यासाठी कुणीही लाच मागत असल्यास वा लाचखोरीसंबंधी कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 1064 वा 9423541064 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !