यावल शहरातील भूषण नगरे यांना ‘माजी राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार’
यावल (मंगळवार, 24 नोव्हेंबर 2026) : यावल शहरातील रहिवासी भूषण नगरे यांना माजी राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जळगाव येथे त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जळगावचे आमदार राजूमामा भोळे, अमोल अनशाबा, सतीश बाविस्कर, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, शशिकांत पाटील, नीता सतीश बाविस्कर, हाजी अब्दुल मजीद जकरिया, एकता संघटनेचे अध्यक्ष फारूक शेख, हाजी अजमल शाह सह आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील पुरस्कारार्थी व त्यांचे कुटुंबीय मित्रमंडळी व इतर प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन अली अंजुम रिझवी यांनी केले. सोहळा यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष फारुख शाह नौमानीसह आदींनी परिश्रम घेतले.
