धुळ्यात दोन गावठी कट्ट्यासह तीन जिवंत काडतूस पकडले
गुन्हे शाखेची गोपनीय माहितीवरून कारवाई : दोघा आरोपींना अटक
धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीवरून दोघांच्या मुसक्या आवळत दोन गावठी कट्ट्यांसह तीन जिवंत काडतूस जप्त केले आहेत. दीपक सुरेश शिरसाठ (साक्री रोड, धुळे) व अभय दिलीप अमृतसागर (30, रा.कुंडाणे, ता.धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक डॉ.राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलिस उपनिरीक्षक हनुमान उगले, हवालदार श्रीकांत पाटील, संजय पाटील, प्रभाकर बैसाणे, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रविकिरण राठोड, विशाल पाटील, महेश मराठे, गुलाब पाटील आदींच्या पथकाने केली.


