मुलींना फाशी देत विवाहितेनेही मृत्यूला कवटाळले


साक्री शहरातील आदर्श नगरातील घटना : कारण गुलदस्त्यात

साक्री : शहरातील आदर्श नगरात विवाहितेने आपल्या तीन व पाच वर्षीय मुलींना गळफास देत स्वतःदेखील आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी एक वाजता उघडकीस आली. अनिता रवींद्र शिंदे असे मृत मातेेचे नाव असून या घटनेत दोन्ही मुली रीया शिंदे (5) व भाग्यश्री शिंदे (3) यांचाही मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक नितीन देशमुख व सहकार्‍यांनी धाव घेतली. महिलेने मुलींची हत्या व स्वतः आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले. साक्री पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत विवाहितेचा पती सुतारकाम करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !