भुसावळ विभागात संततधार : हतनूरचे 36 दरवाजे उघडले


खरीपाच्या पिकांना होणार फायदा : शेतकर्‍यांमध्ये समाधान

भुसावळ : भुसावळ शहरासह परीसरात बुधवारी रात्री उशिरा पावसाला सुरुवात झाल्यानंतर गुरुवारी व शुक्रवारीदेखील पाऊस मुक्कामी असल्याने जनजीवनावर परीणाम झाल्याचे दिसून आले. शहरातील रस्त्यांची आधीच अमृत योजनेच्या पाईप लाईन टाकल्यामुळे दुरवस्था झाली असतानाच पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सोसावा लागला. दरम्यान, हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात असलेल्या पावसामुळे धरणाचे शुक्रवारी दुपारी 12 वाजता 24 दरवाजे पूर्ण क्षमतेने तर 12 दरवाजे एका मीटरने उघडण्यात आले असून 89 हजार 748 क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. दरम्यान या पावसामुळे खरीपाच्या पिकांना मोठा फायदा होणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !