उद्या सायकल डे : भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचा उपक्रम


भुसावळ : संपूर्ण जगावर कोरोना संक्रमणाच्या संकटाचे ढग दिवसेंदिवस अधिक गडद होत आहेत. मास्क, शारीरिक अंतर इत्यादी संबंधीचे नियम पाळल्यास पुढील काही महिन्यात आपण निश्चितच हे संक्रमण थांबवू शकतो परंतु त्याहीपेक्षा व चिरकाल टिकणारा धोका म्हणजे लोकांची बिघडलेली मनस्थिती व आरोग्य हे होय. शिवाय वेगवेगळ्या शहरातील प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढतच आहे. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून भुसावळ स्पोर्टस् अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे प्रत्येक शनिवार हा सायकल दिवस म्हणून पाळला जाणार आहे. अर्थात शनिवारी शहरात कुठल्याही कामासाठी घराबाहेर पडायचे झाल्यास दुचाकी-चारचाकी व इतर कुठल्याही वाहनांचा वापर न करता सायकलचा वापर करणे हे उद्दिष्ट आहे.

सायकलिंग आरोग्यासाठी महत्त्वाची
सायकलने शहरात प्रवास करणे सहज शक्य आहे त्याचे फायदेदेखील असंख्य आहेत. शहरातील अरुंद व अधिक रहदारीच्या रस्त्यांवर सायकलचा प्रवास सहज व वेळ वाचविणारा तसेच आनंददायी ठरणार असून शिवाय प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी सायकल हा पर्याय सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे. सायकलिंग केल्यामुळे मनस्थिती उत्तम राहते शिवाय आपोआपच व्यायाम होत असल्यामुळे वजन कमी तर होतेच परंतु पचनशक्ती देखील वाढणार आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सुरू होणार्‍या या अभियानात शहरातील खाजगी तसेच सरकारी कार्यालये, विविध संघटना व समस्त नागरिकांनी सहभागी होऊन भारताला आत्मनिर्भरतेकडे नेण्यास मदत करावी, असे आवाहन प्रवीण फालक, डॉ.तुषार पाटील व प्रवीण पाटील यांनी केले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !