जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची संख्या पोहोचली 17 हजार 696 वर
शनिवारी एकाच दिवसात आढळले 565 बाधीत : आतापर्यंत 650 रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात एकीकडे कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत असतानाच दुसरीकडे मात्र सातत्याने कोरोनाबाधीत रुग्ण आढळण्याचे प्रमाणही वाढले आहे. जिल्ह्यात शनिवारअखेर 17 हजार 696 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील तब्बल 650 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. शनिवारी सायंकाळी जिल्हा प्रशासनाला प्राप्त अहवालात एकाच दिवसात 565 नागरीकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
शनिवारी आढळलेले कोरोनाबाधीत असे
जळगाव शहर 138
जळगाव ग्रामीण 38
भुसावळ 26
अमळनेर 59
चोपडा 58
पाचोरा 05
भडगाव 50
धरणगाव 29
यावल 19
एरंडोल 38
जामनेर 11
रावेर 06
पारोळा 32
चाळीसगाव 38
मुक्ताईनगर 13
बोदवड 03
अन्य जिल्हा 02
12 हजार 101 रुग्णांची कोरोनावर मात
जिल्ह्यात शनिवारअखेर 12 हजार 101 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहर निहाय बरे झाले रुग्ण असे- जळगाव शहर 3083, जळगाव ग्रामीण 516, भुसावळ 817, अमळनेर 838, चोपडा 859, पाचोरा 493, भडगाव 633, धरणगाव 502, यावल 480, एरंडोल 615, जामनेर 869, रावेर 670, पारोळा 510, चाळीसगाव 518, मुक्ताईनगर 404, बोदवड 234 व अन्य जिल्हा 60

