अडावदमधील घरफोडीतील आरोपी जाळ्यात


जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : 40 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त

जळगाव : अडावद येथे झालेल्या घरफोडीतील आरोपीच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मुसक्या आवळल्या आहेत. सुनील अमरसिंग बारेला (गवर्‍यापाडा, ता.चोपडा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यातील 28 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल तसेच 12 हजारांचा नवीन मोबाईल जप्त करण्यात आला. आरोपीला अडावद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुधाकर लहारे, एएसआय नारायण पाटील, हवालदार रामचंद्र बोरसे, नाईक मनोज दुसाने, प्रवीण हिवराले, दीपप शिंदे आदींनी केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !