भोळे महाविद्यालयात पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन


भुसावळ : दि भुसावळ पीपल्स चॅरीटेबल संस्थेच्या दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात सोमवारी पाच दिवसीय आंतर शाखीय चर्चासत्राचे उद्घाटन प्राचार्य डॉ.आर.पी फालक यांच्या हस्ते झूम अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाईन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या शैक्षणिक विभागाच्या संचालक प्रा.डॉ.कविता साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती.

सतत कार्य केल्यानेच मिळते यश
प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी मार्गदर्शनात महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधा व प्रगतीबद्दल माहिती दिल. कनिष्ठ महाविद्यालय ते पदवी व पदव्युत्तर तसेच एम.फिल, पीएचडीचे कोण-कोणते कोर्सेस चालतात व विद्यार्थ्यांच्या सर्वंगीन विकासासाठी विविध कार्यक्रम राबविले जातात त्यामुळे महाविद्यालयास नॅक पुर्न मूल्यांकनात बी + श्रेणी प्राप्त झाली असल्याचे सांगून सतत कार्य केल्यानेच यश मिळत असल्याचे ते म्हणाले.

मान्यवरांनी केले मार्गदर्शन
सकाळ सत्रात इला फौंडेशनचे सचिव प्रा.डॉ.जसवंत सिंह यांनी साहित्य आणि साथीचा रोग, सामाजिक-सांस्कृतिक दृष्टीकोन यावर मार्गदर्शन केले. 1918 पासून आपण साथीच्या रोगावर कशी मात करीत आलो आहोत याबाबत माहिती देत त्यावेळीसुद्धा साहित्यावर जास्त प्रभाव दिसून आला नाही व चांगले साहित्य लिहले गेले, असे ते म्हणाले. आय.आय.टी.एम.मद्रासचे प्रा.डॉ.रमेश गारदास यांनी कोविड 19 परीस्थितीमुळे भारतीय तंत्रज्ञान संस्था क्षेत्रातील बदल यावर झालेले परीणाम यावर माहिती दिली. आय.टी.क्षेत्रात व इतर कंपन्या मंदीच्या काळात सुरू होऊ शकत नाही त्यामुळे बर्‍याच लोकांची नोकरी गेली त्यामुळे कुटुंब संस्था यावर मोठे परीणाम दिसून येत असून लग्न होत नाहीत, असेही ते म्हणाले. सावित्रीबाई बाई फुले विद्यापीठ, पुण्याच्या प्रा.डॉ.मेघना उपलाने यांनी ई-शैक्षणिक अध्यापन विविध पध्दती व त्याचा वापर त्यापासून होणारे फायदे व नुकसान यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

दुसर्‍या सत्रात शैक्षणिक प्रणालीची विद्यार्थ्यांना माहिती
दुपार सत्रात इंडोनेशिया येथील प्रा.गुलाह द्वि.अँजेग यांनी कोविड 19 च्या काळात अर्थपूर्ण ई शिक्षण आदींबाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, शैक्षणिक प्रणालीत कार्य करताना सहकार्याची भावना ठेवून शिकविले पाहिजे शिवाय विद्यार्थ्यांचा फायदा कसे होईल व नुकसान टळेल यावर त्यांनी प्रकाश टाकला. करोनाची भारत व इंडोनेशियामधील परीस्थितीची तुलना केली. लखनौ विद्यापीठाचे इंग्रजी विभागप्रमुख डॉ.आर.पी.सिंग यांनी कोविड साथीच्या दरम्यान साहित्य आणि संस्कृती यावर आजचे निरीक्षण यावर बोलताना सांगितले की, मानवतावाद, आधुनिकवाद, शृंगारीक रसाबद्दल लेखन पूर्वी व नंतर कसे आहे ? त्यावर काय परीणाम झाले याबद्दल माहिती दिली.

यांनी घेतले परीश्रम
चर्चासत्राची प्रस्तावना प्राचार्य डॉ.आर.पी.फालक तर सूत्रसंचालन प्रा.अंजली पाटील, प्रा.डॉ.जे.बी.बागुल यांनी केले. आभार संयोजक प्रा.डॉ.एस.व्ही.बाविस्कर मानले. चर्चासत्रासाठी करण नाईक, सर्व आयोजन समिती सदस्य परीश्रम घेत असल्याचे आयोजन सचिव व प्रसिद्धीप्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी कळविले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !