मोबाईल चोरटा लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात


भुसावळ : पुरी-अजमेर एक्स्प्रेसने बडनेरा ते अमळनेर प्रवास करणार्‍या राजकुमार कोरानी (अमळनेर) या प्रवाशाचा 15 हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्याने गाडीने जळगाव सोडल्यानंतर लांबवला होता. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोपनीय माहितीच्या आधारे संशयीत आरोपी अयुब अली अजगर अली (आव्हाने, जळगाव) यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने चोरलेला मोबाईल काढून दिला. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एएएसआय शिंदे, एएसआय किशोर बढे, कॉन्स्टेबल यादव आदींनी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !