भुसावळात रोटरी क्लबतर्फे वृक्षारोपण


पर्यावरण संवर्धनासाठी रोटरी क्लबचा पुढाकार : सदस्यांच्या निवासस्थान परीसरात केले वृक्षारोपण

भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ यांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन व रक्षणासाठी रोटरी क्लब सदस्यांच्या निवासस्थान परीसरात त्यांच्या हातून वृक्षारोपण करण्याचा आगळा-वेगळा उपक्रम रोटरीचे अध्यक्ष गजानन (मामा) ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला. मंगळवारी रोटरी सदस्य गोपाल तिवारी यांच्या हस्ते त्यांच्या राहत्या घरी पुरुषोत्तम नगरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ भुसावळचे अध्यक्ष गजानन ठाकूर, माजी अध्यक्ष राजेश अग्रवाल, महेश भराडे, राधेशाम लाहोटी, संजय अग्रवाल, विकास कात्यायनी, द्वारकादास हेडा, मदन बोरकर, नगरसेवक अ‍ॅड.बोधराज चौधरी, मनोज गुलईकर आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !