जळगावात चोरी : आरोपीस तीन दिवसांची पोलिस कोठडी


जळगाव : बळीरामपेठेतील योगेश पवार यांच्या घरी 14 ऑगस्टच्या मध्यरात्री चोरी झाली होती. या प्रकरणी शहर पोलिसांनी अटक केलेला चोरटा रिजवान उर्फ काल्या गयासुद्दीन शेख (वय 22, रा.तांबापुरा) याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीअंती त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. योगेश काशीनाथ पवार (44, रा.बळीराम) पेठ यांची तीन मजली इमारत आहे. पवार कुटुंब शुक्रवारी मध्यरात्री घराच्या वरच्या मजल्यावर झोपलेले असताना खाली टॉमीने दरवाजा तोडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेले 5 ग्रॅम वजनाच्या 3 सोन्याच्या अंगठ्या, 5 ग्रॅम सोन्याचा तुकडा, दोन चांदीच्या मुर्त्या आणि 7 ते 8 हजार रुपयांची रोकड असा सव्वा लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पवार यांच्या घरात, अंगणात चिखलामुळे चोरट्याच्या चपलेचे ठसे उमटले होते. या ठशांवरुन शहर पोलिसांनी चोरट्याची ओळख पटवली. संशयीत रीजवान उर्फ काल्या यास शहर पोलिसांनी अटक केली असून त्याचा साथीदार समीर काकर हा पसार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !