भुसावळात जागतीक छायाचित्रदिनी ज्येष्ठांच्या हस्ते कॅमेरा पूजन
भुसावळ : जागतिक छायाचित्रकार दिनाचे औचित्य साधून भुसावळातील वरीष्ठ छायाचित्रकार बांधवांनी सोशल डिस्टन्सचे पाळत घरीच कॅमेरा पूजन केले. भुसावळातील गणेश पुरीमधील नरसिंग राठोड यांच्या घरी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमा फोटोग्राफर नरसिंग राठोड यांनी कॅमेरा पूजन केले. प्रास्ताविक रेल्वे स्कूलचे कला शिक्षक राजेंद्र जावळे यांनी फोटोग्राफी वर आधारीत कवीता सादर करुण केले. त्यानंतर जुन्या फोटोग्राफर्सचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील विवेक वणीकर, नरसिंग राठोड, राजेंद्र जावळे, अविनाश साळी, हरी बर्हाटे, श्याम गोविंदा, श्रीकांत पवार, गणेश राठोड, भरत शिंपी आदी उपस्थित होते. आभार अविनाश साळी यांनी मानले. यावेळी फोटोग्राफीबद्दल विवेक वणीकर यांनी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी गणेश राठोड यांनी परीश्रम घेतले.

