सावदा खुनाने हादरले


50 वर्षीय इसमाचा निर्घूण खून ः संशयीतांचा कसून शोध

सावदा : शहरातील ख्वाजा नगर परीसरात गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास 50 वर्षीय इसमाचा डोक्यावर वार करून खून करण्यात आल्याची घटना घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रईस दिलदार चौधरी उर्फ रईस दंगा (50) असे मयताचे नाव आहे. शहरातील मरीमाता मंदिर परीसरातील मागील बाजूस असलेल्या ख्वाजा नगरच्या गेटसमोर असलेल्या किराणा दुकानाजवळील बखळ जागेत रईस दंगा बसलेला असतानाच तीन संशयीतांनी त्याच्यावर लोखंडी पाईपाने वार केले व प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. मयतावर लालबाग पोलिस स्टेशन, बर्‍हाणपूर येथे गुन्हेदेखील दाखल असल्याची चर्चा आहे. खुनाची घटना कळताच अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ व सहकार्‍यांनी धाव घेत पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तपास सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, हवालदार रवींद्र मोरे, संजय चौधरी व सहकारी करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !