महाराष्ट्रातील भूमिपुत्रांनाच शासकीय नोकर्‍यांमध्ये प्राधान्य द्या


शिशिर जावळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

भुसावळ : मध्य प्रदेश सरकारतर्फे मध्यप्रदेशातील तरुणांनाच, स्थानिकांना (भूमिपुत्रांना) त्यांच्यात राज्यात शासकीय विभागामध्ये नोकर्‍या देण्यात येणार आहे. यासाठी तेथील मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान सरकार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत आहे. भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय झाल्यास मध्य प्रदेशातील च तरुणांना त्यांच्याच राज्यात नोकरी करता येईल. इतर राज्यातील तरुण मध्य प्रदेशात नोकरी करू शकणार नाहीत. या निर्णयामुळे मोठया प्रमाणात भूमिपुत्रांना नोकर्‍या उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रात देखील बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढत असून अनेक सुशिक्षित बेरोजगारावर उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली. महाराष्ट्र सरकारने मध्यप्रदेश सरकारप्रमाणे निर्णय घेतल्यास महाराष्ट्रातील तरुणांना फक्त राज्यातील शासकीय सेवांमध्ये नोकरीची मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार असल्याने तसा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी प्रधानमंत्री जनकल्याण योजना प्रचार अभियान तथा राष्ट्रीय संत सुरक्षा परीषद भारताचे जळगाव जिल्हाध्यक्ष शिशिर दिनकर जावळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !