भुसावळ आगारातून पाच महिन्यानंतर धावल्या बसेस
भुसावळ : आंतर जिल्हा वाहतुकीला परवानगी मिळाल्यानंतर गुरुवारी भुसावळ आगारातून आठ मार्गावर बस सोडण्यात आल्याने तब्बल एक हजार 200 किलोमीटरचे अंतर कापल्यानंतर आगाराला 11 हजारांचे उत्पन्न मिळाले. कोरोनामुळे लॉकडाऊन व त्यातच एस.टी.बसेसची वाहतूक बंद करण्यात आल्याने आगाराला मोठा फटका बसला आहे. बुधवारी आंतर जिल्हा वाहतुकीला परवानगी मिळाल्यानंतर जिल्ह्यासह शेजारच्या बुलढाणा जिल्ह्यात सुध्दा एक लांब पल्याची बस महामंडळाकडून सोडण्यात आली. गुरुवारी पहाटे सहा वाजता बुलढाणा येथे बस सोडण्यात आली तसेच सातला जळगाव, नंतर रावेर, यावल, पाचोरा, जामनेर, फैजपूर, सावदा, रावेर या मार्गावर बस सोडण्यात आल्या.

