सेतू सुविधा केंद्रातून दाखले मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान


राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस राजेंद्र चौधरी करणार तक्रार

वरणगाव : इयत्ता दहावी व बारावीचे निकाल लागले असून पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून यासाठी लागणारे विविध दाखले भुसावळ येथील सेतू सुविधा केंद्रातून मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राजेंद्र चौधरी सोमवारी भेटून तक्रार करणार असून दाखले लवकर द्यावे, अशी मागणी करण्यात येणार आहे.

दाखल्यांअभावी शैक्षणिक नुकसान
इयत्ता व दहावी बारावीचा निकाल लागला असून इयत्ता अकरावी व पुढील इंजीनिअरींग, मेडिकल, डी.फार्मसी, बी.फार्मसी, आयटीआय यासह विविध शाखांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून यासाठी लागणारे डोमेसाईल जातीचे दाखले उत्पन्नाचे दाखले यासाठी भुसावळ येथील सेतू सुविधा केंद्रात विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. जवळपास पंधरा ते वीस दिवस उलटूनदेखील या ठिकाणाहून दाखले मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्याचप्रमाणे प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून दाखल्या अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. संबंधित विभागाने यावर दखल घेऊन विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्वरीत विद्यार्थ्यांना दाखले देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा सरचिटणीस राजेंद्र चौधरी यांनी केली आहे

तक्रार करणार
शहरातील अनेक विद्यार्थ्यांनी विविध दाखले मिळवण्यासाठी सेतू सुविधा केंद्राकडे अर्ज केले परंतु अद्यापही हे दाखले मिळाले नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने यावर प्रांताधिकारी रामसिंग सुलाने व मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस राजेंद्र चौधरी म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !