रतन टाटांसारख्या उद्योगपतींमुळे पुन्हा भारत आत्मनिर्भर
भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप
भुसावळ : दि भुसावळ पीपल्स चॅरीटेबल संस्थेच्या दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात पाच दिवसीय आंतरशाखीय चर्चासत्राचा नुकताच समारोप झाला. समारोपप्रसंगी मुंबईच्या एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.शशिकला वंजारी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्याीपठाचे व्यवस्थापन परीषद सदस्य दिलीप रामू पाटील, पुण्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे डीन डॉ.संजीव सोनवणे, कॉम्प्युटर सोसायटी इन इंडियाचे अध्यक्ष रामकृष्ण व्यास, सिनेट व व्यवस्थापन परीषद सदस्य तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक उपस्थित होत. दरम्यान, कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटानंतर आता रतन टाटांसारख्या उद्योगपतींमुळे देश आत्मनिर्भर होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.
ऑनलाईन हाच तूर्त पर्याय
मुंबईच्या एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.शशिकला वंजारी म्हणाल्या की, अचानक कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने सर्वांपुढे ऑनलाईन हाच पर्याय समोर आला व शिक्षणात अचानक बदल घडून आला व त्याला आपण समोर जात आहोत. विद्यार्थी व शिक्षक यांनी सामाजिक दुरी ठेऊन शिक्षण सुरू केले आहे. यामध्ये लार्ज ग्रुप तयार करून शिक्षण देत आहेत व त्याचे फायदे सुद्धा दिसून येत आहेत. पुणे विद्यापीठाचे डीन संजीव सोनवणे म्हणाले की, शिक्षण जीवनाचा भाग असून ऑनलाईन शिक्षणात तीन पूर्व चालू व नंतर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शिक्षण हे सायकल आहे, ऑनलाईन 70 असेसमेंट टूल आहेत.

ई चर्चासत्रांचे आयोजन काळाची गरज
कॉम्प्युटर सोसायटी इन इंडियाचे अध्यक्ष रामकृष्ण व्यास म्हणाले की, साथीच्या रोगात सर्व भागात अडचण निर्माण झाली आहे. आय.टी.मध्ये सुद्धा प्रॉब्लेम आले आहेत. सर्व ऑनलाईन सुरू असून विविध टूलच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. आजच्या काळात ई चर्चासत्रांचे आयोजन ही काळाची गरज आहे. अॅकडमिक टूल बद्दल माहिती चर्चासत्रात मिळालीच असून त्याचा शिक्षणात उपयोग होईल, असेही ते म्हणाले.
कोरोनामुळे जनजीवनावर परीणाम
दिलीप रामू पाटील म्हणाले की, कोरोनाने सर्व जगातील जीवनावर परीरणाम केला आहे. सामाजिक दुरी वाढली असलीतरी ऑनलाईनमुळे जवळीकता आली . या काळात डिजिटल टेक्नॉलॉजीचा उपयोग झाला, शिक्षणात खूप बदल झाला आहे तसेच या काळात ग्लोबल वातावरण बदलले आहे. कंपन्या बंद आहेत, अनेकांच्या नोकरी गेल्या असून आता मजुरांची वाणवा असून सर्वांनाच आर्थिक विवंचना आहे. सध्या विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम, उत्सव बंद असल्यामुळे सहभागी घेऊ शकत नाही. एकमेकांच्या मदती शिवाय काहीच होत नाही पण तरी आपण जीवन जगत आहोत. सकारात्मक मानसिकता ठेऊन पुढे जायचे आहे. रतन टाटा सारखे उद्योगपती पुढे येऊन पुन्हा भारत घडवतील व भारत आत्मनिर्भर बनेल, अशी आशा आहे. दरम्यान, प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी चर्चासत्रासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदविल्याने भारतासह, इंडोनेशिया, केनिया, लुसोतो, पाच देशातील संशोधकांचे महाविद्यालयातर्फे आभार मानले
47 संशोधकांकडून संशोधन पेपरांचे सादरीकरण
डॉ.सनी हसानी, जसंदीपकौर फुल, पी.कार्तिका, अकबर मोहम्मद, श्रेयल घोष , सुप्रियो हलदर यांनी मनोगत व्यक्त केले. पाच दिवसीय चर्चासत्रात 190 लोकांनी सहभाग घेतला तर 47 संशोधक यांनी संशोधन पेपर सादर केले. 17 आगस्ट 2020 रोजी पाच दिवसीय आंतर शाखीय चर्चासत्राचे उद्घाटन प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांच्याहस्ते झूम अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील शैक्षणिक विभागाच्या संचालक प्रा.डॉ.कविता साळुंके उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रा.अंजली पाटील, प्रा.डॉ.जे.बी.बागुल यांनी केले. या चर्चासत्रासाठी आभार प्रा.डॉ.एस.व्ही.बाविस्कर यांनी मानले. करण नाईक, ज्योती लष्करी व सर्व आयोजन समिती सदस्यांनी परीश्रम घेतल्याचे चर्चासत्राचे चेअरमन प्राचार्य डॉ.आर.पी.फालक व आयोजन सचिव व प्रसिद्ध प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी कळवतात.

