भुसावळात एकास मारहाण : सात जणांविरुद्ध गुन्हा
भुसावळ : शहरातील अजित नगर भागातील मन्यार हॉल जवळ मध्ये विटा टाकल्याने महिलेने याबाबत बोलले असता महिलेच्या मुलास सात जणांनी मारहाण केल्याची घटना 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सात जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील मन्यार हॉलजवळ ड्रेनेजमध्ये सैफोउद्दीन शेख शफी यांच्या मुलाने विटा टाकून लाईन जाम केल्याने शेख यांना त्याबाबत बोलल्याचा राग आल्याने शेख रहिमउद्दीन शेख शफी, शेख सैफोद्दीन शेख जैनुद्दीन, शेख नईम शेख सैफोउद्दीन, शेख मोहिन शेख सैफ्फुद्दीन, शेख अब्रार शेख शमशुद्दीन आणि शेख मुस्तफा शेख सैफुद्दीन (रा. भुसावळ) यांनी शेख नाजीश याला लोखंडी रॉड आणि चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत पुढील तपास करीत आहे.

