भुसावळ तालुक्यात 74 मंडळांकडून श्रींची स्थापना


भर पावसातही भाविकांचा उत्साह कायम : रॅपीड अ‍ॅक्शन फोर्सचे शंभर जवान दाखल

भुसावळ : विघ्नहर्त्या गणरायाची शनिवारी शहरात मोठ्या उत्साहात भाविकांनी स्थापना केली. पावसाची संततधार असलीतरी भाविकांचा उत्साह मात्र कायम होता. शहरातील 74 तर ग्रामीण भागात 27 मंडळांनी श्रींची स्थापना केली. शनिवारी गणेश चतुर्थी निमित्त भाविकांनी घरोघरी आणि शहरातील सार्वजनिक मंडळातर्फे श्रींची स्थापना करण्यात आली. घरामध्ये दोन फुटी तर सार्वजनिक गणेश मंडळात चार फुटांपर्यंत उंचीची मूर्ती बसविण्याची परवानगी पोलिसांनी दिल्याने भाविकांनी सूचनांचे पालन केले. रात्री उशिरापर्यंत भाविकांतर्फे आणि मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी श्रींची स्थापना केली.

शहरात 74 मंडळांकडून श्रींची स्थापना
शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 24 बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सत्तेचाळीस सार्वजनिक आणि तीन खाजगी तर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत ग्रामीण भागात 27 मंडळातर्फे श्रचिी मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली. कोरोना पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी गणपतीच्या आगमनाची मिरवणूक काढू नये, अशा सक्त सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्याने अत्यंत साध्या पद्धतीने मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी श्रींची स्थापना केली.  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

रॅपीड अ‍ॅक्शन फोर्सचे जवान दाखल
उत्सवाच्या पार्श्वभुमीवर शहरात बंदोबस्तासाठी
रॅपीड अ‍ॅक्शन फोर्सचे जवान दाखल झाले असून बियाणी स्कूलमध्ये फिजीकल डीस्टंन्सिंग ठेवत त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. 100 जवानांची एक तुकडी शुक्रवारी सायंकाळी शहरात दाखल झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात बंदोबस्तासाठी रॅपीड अ‍ॅक्शनफोर्सचे जवान आले आहे. भुसावळसह जळगाव येथेही त्यांचा
बंदोबस्त राहणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागात गणेश मंडळे, महत्वपूर्ण पॉइंटवर बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

अधिकार्‍यांकडून बंदोबस्ताचा आढावा
डीवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दिलीप भागवत, निरीक्षक बाबासाहेब ठोबे, निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी त्यांच्या हद्दीतील गणेश मंडळांना भेटी देत स्टेजची पहाणी केली. कुठे कुठे पोलिसांसह बाहेरून आलेल्या फोर्सचा बंदोबस्त तैनात करायचा आहे. याचे पॉइंट फिक्स केले. शहरातील महत्वाच्या भागात पोलिसांचा बंदोबस्त लावला जात आहे. शहर पोलिस ठाण्याची हद्दीत आणि बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. शहरात रॅपीड अ‍ॅक्शन फोर्सचे सुमारे 100 जवान दाखल झाले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !