भुसावळात व्यापार्यांची सक्तीने होणारी कोरोना तपासणी थांबवा
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांचे प्रांताधिकार्यांना निवेदन : कोरोनाची लक्षणे आढळणार्यांचीच तपासणी होण्याची अपेक्षा
भुसावळ : शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरातील सर्वच व्यापारी, व्यावसायीकांना कोरोना तपासणी करण्याची सक्ती करण्यात आली आहे मात्र तपासणीसाठी प्रत्यक्षात दोनशे लोक आल्यानंतर केवळ शंभर लोकांची तपासणी होत असल्याने अन्य लोकांनी पुन्हा माघारे फिरावे लागत आहे. यामुळे व्यापार्यांना मोठा मनस्ताप सोसावा लागत आहे. तपासणीमुळे म्युन्सीपल हायस्कूलमध्ये नाहक मोठी गर्दी होत असून कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यापार्यांची तपासणी केली जावी तसेच सक्तीची तपासणी करू नये, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी प्रांताधिकारी प्रशासनाकडे सोमवारी निवेदनाद्वारे केली. प्रांताधिकारी कार्यालयातील राहुल नाईक यांनी निवेदन स्वीकारले.


