जळगाव पोलिसांच्या हातावर तुरी देणारे आरोपी अखेर जाळ्यात
जळगाव : एटीएम फोडून चोरी केल्याप्रकरणातील आरोपींना जिल्हा पेठ पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना हरीयाणातील फरीदाबादमधील निमका कारागृहात पोहोचविण्यासाठी जिल्हा पेठ पोलिसांचे पथक रवाना झाले होते मात्र आरोपींनी पोलिसांच्या हातावर तुरी देवून एका हॉटेलातून पलायन केले होते. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचा कसून शोध सुरू असताना हरीया पोलिसांनी आरोपी निसार शफुर सैफी (38) आणि त्याचा लहान भाऊ इरफान शफुर सैफी (29, रा.पलवल, हरियाणा) यांना फरीदाबाद येथील ट्रान्सपोर्ट नगर भागातून शुक्रवारी रात्री आठ वाजता अटक केली आहे.

