चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसाचे वितरण
यावल : टायगर ग्रुपतर्फे लॉकडाउन काळात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली व त्यातील विजेत्यांना नुकतेच मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. पै.तानाजी भाऊ जाधव टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष खान्देश अध्यक्ष ऋषिकेशबाबा भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण करण्यात आले. दोन गटात स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात पहिली ते पाचवीच्या पहिल्या गटात प्रथम- रीया विकास चौधरी (न्हावी), द्वितीय- दर्शना लतेश बारी, तृतीय- मानस निलेश पराशर व द्वितीय सहावी ते दहावीच्या गटात प्रथम- रोहित विजय बारी, द्वितीय- गीतल केतन पाटील, तृतीय- राधिका सुनील उंबरकर आली. दरम्यान बक्षीस वितरण समारंभास प्रमुख उपस्थित म्हणून संदीप भारंबे, भूषण फेगडे, निर्मल चोपडे यांची उपस्थिती होती.सहभागी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले. स्पर्धेसाठी डॉ.कुंदन फेगडे, निर्मल चोपडे व भूषण फेगडे या दात्यांनी सहकार्य केले.

