लॉकडाउन काळातील वीज बिल माफ करा


एमआयएम पक्षाची मुख्यमंत्र्यांसह उर्जामंत्र्यांकडे मागणी : स्थानिक प्रशासनाला दिले निवेदन

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्याची मागणी इंडिया मजलिस ए इततेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या वतीने सोमवारी स्थानिक प्रशासनाकडे करण्यात आली. या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे करण्यात आली आहे.

अशा आहेत मागण्या
एमआयएम पक्षाच्या निवेदनानुसार राज्यातील सर्व शेतकर्‍यांना तसेच घरगुती 100 युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या असलेल्या नागरीकांचे संपूर्णपणे वीज बिल माफ करावे, ज्या ग्राहकांचे वीज वापर 500 युनिट पर्यंत आहे त्यांचे 50 टक्के माफ करावे, ज्या ग्राहकांचा वीज वापर 500 युनिटपेक्षा जास्त आहे त्यांचे 30 टक्के वीज बिल माफ करण्यात यावे, असे निवेदनात नमूद आहे या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास 1 सप्टेंबरपासून संविधानिक रीतीने पूर्ण राज्यात पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व मागण्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार बॅरीस्टर असदुद्दीन ओवैसी यांच्या आदेशानुसार व पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व खासदार इम्तियाज जलील, पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.गफ्फार कादरी यांच्या अध्यक्षतेखाली व पक्षाचे जळगांव जिल्हाध्यक्ष (रावेर लोकसभा) फिरोज शेख यांच्या नेतृत्वात करण्यात आल्या. निवेदन देताना भुसावळ तालुकाध्यक्ष अशरफ तडवी, भुसावळ शहराध्यक्ष शोएब बागवान, जिल्हा महासचिव कलिम शेख, युवा जिल्हाध्यक्ष नावेद खान, विद्यार्थी विंग जिल्हाध्यक्ष नईम शेख आदींची उपस्थिती होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !