मोहरमनिमित्त बोदवडमधील शाहवली दर्ग्यावर पोलिस निरीक्षकांनी चढवली चादर
बोदवड : मोहरम उत्सवानिमित्त बोदवडचे पोलिस निरीक्षक बळीराम हिरे यांनी शहरातील शाहवली यांच्या दर्ग्यावर जावून चादर चढवली. मोहर्रमनिमित्त सवारीबाबत सूचना देत आढावा पोलिस प्रशासनातर्फे बैठक घेण्यात आली. दर्गाह कमिटीतर्फे पोलिस निरीक्षक हिरे, शिवसेना तालुकाध्यक्ष गजानन खोडके, जिया शेख, विनोद मोरे, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष कलीम शेख, यांचा सत्कार करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी छगन भोई, मोहर्रम समिती अध्यक्ष मनोज मोरे, संतोष भगत, मन्नू काका कंडक्टर, सुभान बाबा, आमी भगत, नईम शाह, नईम बागवान, गोपाल पाटील, हबीब बाबा, सलाम भगत, गब्बू बाबा, गुना भगत, भास्कर भगत हिवराळे, गुरुजी भगत, नीलेश ठाकरे भगत, सांडू शाह व सर्व भगत उपस्थित होते.


