भुसावळातील प्रस्तावीत मेमू वर्कशेड 2021 पर्यंत पूर्ण होणार


भुसावळ डीआरएम विवेककुमार गुप्ता : देवळाली पॅसेंजरचे मेमू ट्रेनमध्ये लवकरच रूपांतर

भुसावळ : भुसावळातील प्रस्तावीत मेमू वर्कशेडचे काम डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी ऑनलाईन पत्रकार परीषदेत दिली. वर्कशेडच्या कामासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर ती लांबली आहे. टेंडरींग झाल्यानंतर तत्काळ कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मध्य रेल्वेच्या वतीने सोमवार, 24 रोजी दुपारी चार वाजता भुसावळ विभागासाठी आयोजित ऑनलाईन पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

882 आयसोलेशन कोच तयार
डीआरएम म्हणाले की, भुसावळात रेल्वे हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत 457 कोरोनाबाधीतांवर उपचार करण्यात आले आहे. कोरोनाची भयावह स्थिती पाहता मध्य रेल्वेने कमीत-कमी खर्चात अडगळीत पडलेल्या रेल्वे डब्यांमध्ये सुधारणा कररून 882 आयसोलेशन कोच तयार केले. त्यातील 20 कोच भुसावळ विभागात आहे. सुदैवाने आतापर्यंत या आयसोलेशन कोचेसची आवश्यकता भासलेली नाही. रेल्वे हॉस्पिटल कोविड सेंटरमध्ये 64 बेडची व्यवस्था असून विभागातील अन्य स्थानकांवर अशी व्यवस्था नसली तरी शासनाच्या मदतीने इतर ठिकाणी उपचार सुरू आहेत. विभागातून किसान विशेष ट्रेन धावत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

देवळाली पॅसेंजरचे मेमू ट्रेनमध्ये रूपांतर
डीआरएम म्हणाले की, देवळाली पँसेजरचे लवकरच मेमू ट्रेन मध्ये रुपांतर होणार असून लोकल ट्रेन नाशिक पर्यंत धावण्यासाठी इगतपुरी-कसारा घाट सेक्शनमध्ये चाचणी झालेली नाही तसेच भुसावळ-देवळाली मेमू ट्रेन इगतपुरी पर्यंत धावणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाऊनमुळे रेल्वे गाड्यांच्या इंधनाच्या रुपात होणार 70-80 कोटी रुपयांचा खर्च वाचला आहे. हॉर्ल्टीकल्चर ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव सध्यातरी विचाराधीन नसल्याची माहिती डीआएम गुप्ता यांनी दिली. शहरातील आराधना कॉलनजवळील बोगद्याचे काम राज्य शासनाच्या अडचणींमुळे थांबले आहे. त्याला मंजुरी मिळताच बोगद्याचे काम पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.

यांची होती उपस्थिती
ऑनलाईन पत्रकार परीषदेसाठी वरीष्ठ वाणिज्य व्यवस्थापक युवराज पाटील, वरीष्ठ मंडळ परीचालन प्रबंधक आर.के.शर्मा, मंडळ सुरक्षा आयुक्त क्षितीज गुरव, वरीष्ठ मंडळ सिग्नल अभियंता निशांत द्विवेदी, उप मुख्य अभियंता (निर्माण) रोहित थावरे तर मुंबई येथून मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार उपस्थित होते.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !